वाई येथील नंदनवन कॉलनीत एका बंगल्यामध्ये  पोलिसांचा छापा; 2.36 लाखांचा गांजा व दुचाकी व इतर साहित्य असा 8 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त


स्थैर्य, वाई, दि.१६: वाई येथील नंदनवन कॉलनीत एका बंगल्यामध्ये  पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेने छापा मारून 2.36 लाखांचा गांजा व दुचाकी व इतर साहित्य असा 8 लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी  जर्मनीतून आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सर्गीस व्हिक्टर मानकी वय 31 आणि सेवेस्टिएन स्टेन मुलर वय 25 अशी त्यांची नावे आहेत.  संशयितांवा यापूर्वी गोवा अशाच गुन्ह्यात अटक होवून त्यांचे व्हिसा, पासपोर्ट  जप्त झाले आहेत.

याबाबत माहिती अशी, वाईतील नंदनवन कॉलनीत श्री विष्णुस्मृती बंगला या  ठिकाणी दोन परकीय नागरीक राहत आहेत व त्यांच्या हालचाली संशयास्पद  आहेत अशी माहिती जिल्हा विशेष शाखे मिळाली. या शाखेचे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी अप्पर पालीस अधीक्षक यांच्या  मार्गदर्शनाखाली जिविशाचे सपोनि प्रताप भोसले, हवालदार विश्‍वास देशमुख,  सागर भोसले, सुमित मोरे, चालक संभाजी साळुुंखे यांच्या पथकाने त्याठिकाणी  वाई पोलीस ठाण्याचे पोनि खोबरे, पोउनि कदम व अधिकारी व अंमलदार  यांच्यासह संबंधित बंगल्यावर छापा टाकला. त्याठिकाणी दोन जर्मन परकीय  नागरीक बंगल्यात मिळून आले. त्याठिकाणी गांजा वनस्पतीची बोंडे तसेच  गांजा वनस्पतीची लहान मोठी रोपे आढळून आली. अमली पदार्थ विषयक  वनस्पती असल्याने त्याबाबतची सर्व खातरजमा करण्यासाठी दि 15 रोजी व  दि. 16 रोजी पुणे येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडील  तज्ञांचे पथकासह सविस्तर घरझडती घेतली. या ठिकाणी सुमारे 2 लाख 36 हजार 760 रुपयांची 29 किलो वजनाची   गांजाची झाडे, पाने व बोंडे, कोकोपीट, खते व भुसा यांची एकुण 10 पोती,  फ्लॉवर ग्रोथ बुस्टरचे 3 कॅन, केमिकल फवारणीचा पंप, तीन एक्झॉस्ट फॅन व  सामुग्री, दोन टेबल फॅन, पाच तापमापक दर्शक मिटर, एक ट्युट लावण्याचे प ॅनेल, चॅम्पियन कंपनीचा इनव्हर्टर, चार एक्साईड कंपनीच्या बॅटरी, तीन पॉली  हाऊस, रॉयल इन्फील्ड कंपनीची मोटार सायकल, एक केटीएक कंपनीची  मोटार सायकल, तीन लॅपटॉप, तीन मोबाईल असा एकूण 8 लाख 21  हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.याप्रकरणी एन.डी.पी.एस. या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु  आहे . या आरोपींच्या विरुध्द यापुर्वी गोवा राज्यातील परनम पोलीस ठाण्यात  एनडीपीस कायद्यानुसार 2017 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या  गुन्हयात ते जामिनावर आहेत. याबाबतही तपास सुरु आहे.

सदर घटनास्थळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस  अधीक्षक धीरज पाटील व उप विभागीय पालीस सातारा ग्रामीण गणेश किंद्रे  यांनी भेट दिलेली आहे. अप्पर पालीस अधीक्षक सातारा व उविपोअ गणेश किं द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा नोंदवुन इतर प्रक्रिया सुरु आहे.


Back to top button
Don`t copy text!