बेरोजगार उमेदवारांसाठी दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी प्लेसमेंट ड्राईव्ह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । सातारा । जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील रिक्त पदांवर बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच 13 एप्रिल 2023 रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. तरी जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.

गरजु विद्यार्थ्यांनी कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करुन ऑनलाईन अर्ज करावा व स्वखर्चाने आपल्या कागदपत्रांसह प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!