दैनिक स्थैर्य | दि. ९ डिसेंबर २०२३ | फलटण |
ऐतिहासिक फलटणची प्रसिध्द श्रीराम प्रभूंची रथोत्सव यात्रा आज, दि. ९ डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहे.
: श्रीराम यात्रेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
- शनिवार, दि. ९ डिसेंबर कार्तिक वद्य ११ – सायंकाळी ५ ते ७ कीर्तन, रात्री ९ ते ११ वाहन – प्रभावळ.
- रविवार, दि. १० डिसेंबर कार्तिक वद्य १२ – सायंकाळी ५ ते ७ कीर्तन, रात्री ९ ते ११ वाहन – शेष.
- सोमवार, दि. ११ डिसेंबर कार्तिक वद्य १४ – सायंकाळी ५ ते ७ कीर्तन, रात्री ९ ते ११ वाहन – गरूड.
- मंगळवार, दि. १२ डिसेंबर मार्गशीर्ष १४/१५ – सकाळी ९ ते ११ या वेळेत श्रीराम प्रभूंच्या रथास ११ ब्राह्मणांचा लघुरूद्राभिषेक होऊन दुपारी २ नंतर रथास पोशाख, रात्री ५ ते ७ कीर्तन, रात्री ९ ते ११ वाहन – मारूती.
- बुधवार, दि. १३ डिसेंबर मार्गशीर्ष शु. १ – सकाळी ७ ते ८ श्रीराम मंदिरात कीर्तन होऊन ‘श्रीं’च्या मूर्ती सकाळी ८ वाजता श्रीराम प्रभूंच्या रथात बसवून रथ दिवसभर फलटण शहरातून फिरवून सायंकाळी ७ वाजता श्रीराम मंदिरात येईल.
श्रीराम प्रभूंच्या या यात्रा कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री नाईक निंबाळकर देवस्थान व इतर चॅरिटीज् ट्रस्ट, फलटण यांच्यातर्फे करण्यात आले आहे.