
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ९ डिसेंबर २०२३ | फलटण |
महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा व नगर परिषद फलटण यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १२ ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री नगर परिषद पार्किंग मैदान, मुधोजी हायस्कूल समोर, फलटण येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी १०.०० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ७५ बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांनी प्रदर्शनास भेट देऊन महिला बचत गटांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन श्री. विजय डोके, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी केले आहे.
