फलटण शहराच्या प्रत्येक चौकातील महापुरूषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण लवकरच करणार – खासदार रणजितसिंह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २२ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहरातील प्रत्येक चौकात महापुरूषांचे पुतळे आहेत. या पुतळ्यांचे सुशोभीकरण लवकरच करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये फलटण शहराच्या प्रत्येक चौकामध्ये जे महापुरूषांचे पुतळे आहेत त्यांचे भव्य असे सुशोभीकरण करून फलटण शहराच्या वैभवामध्ये भर टाकण्याचे लवकरच काम हाती घेणार आहे. त्यासाठी लागेल तो निधी उपलब्ध केला जाईल.

या महापुरूषांचा आत्तापर्यंत जो अवमान झाला आहे तो थांबवणार असून नव्या पिढीला या महापुरूषांकडून आदर्श घेता येईल, अशा पद्धतीची माहिती त्या सुशोभीकरणामध्ये करण्यात येईल, असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.

Back to top button
Don`t copy text!