फलटणमध्ये होणार अत्याधुनिक मटण व मच्छि मार्केट; श्रीमंत रामराजेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटण शहरामधील मंगळवार पेठ येथे मटण व मच्छि मार्केट होते परंतु सदरील इमारत हि धोकादायक झाल्याने सदरील इमारत हि जमीनदोस्त करण्यात आलेली आहे. आता भविष्याचा वेध घेऊन फलटण शहरामध्ये अत्याधुनिक मटण व मच्छि मार्केट बनवण्यात येणार आहे. सदरील इमारतीमध्ये तळमजल्यावर मटण मार्केट तर पहिल्या मजल्यावर मच्छि मार्केट सुरु करण्यात येणार आहे. सदरील इमारतीचे भूमिपूजन विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी फलटणचे आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, मुख्याधिकारी संजय गायकवाड, जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, किशोर नाईक निंबाळकर, सनी अहिवळे, अजय माळवे, बाळासाहेब मेटकरी, नगरसेविका सौ. वैशाली अहिवळे, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. प्रगती कापसे, सौ. दीपाली निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!