फलटण – बारामती रोडवरचा खड्डा ठरु शकतो जीवघेणा


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । बारामती रोडवरील पाहुणेवाडी नजिक मुख्य रस्त्यावर अतिशय मोठा खड्डा पडला असून या ठिकाणी पावसाचे पाणी साठल्याने वाहनचालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने हा खड्डा जीवघेणा ठरू शकतो.

फलटण – बारामती रस्ता हे नेहमीच वाहतुकीने गजबजलेला असतो. या रस्त्यावर चार – चाकी वाहनांसह अवजड वाहने, दुचाकी स्वार अशा सर्वांचीच गर्दी असते. अशा या नियमित रहदारीच्या रस्त्यावर जेथे हा खड्डा आहे, त्याठिकाणी रात्रीच्यावेळी एखादा पादचारी किंवा वाहनचालक खड्ड्यात पडून अपघात घडू शकतो. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधित विभागाने तात्काळ हा खड्डा बुजवावा अशी मागणी स्थानिकांसह वाहनचालकांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!