फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या बाईक रॅलीस अभूतपूर्व प्रतिसाद; श्रीमंत संजीवराजेंनी केला शुभारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 22 एप्रिल 2023 | फलटण | फलटण शहरासह तालुक्यामध्ये पारंपारिक शिवजयंती प्रतिवर्षी साजरी होत असते. शिवजयंतीच्या औचित्य साधून फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बाईक रॅलीला अभूतपूर्व असा प्रतिसाद फलटणकरांकडून मिळालेला आहे. बाईक रॅलीची सुरुवात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले व त्यानंतर ते बाईक रॅलीमध्ये सहभागी सुद्धा झाले होते.

यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये “छत्रपती शिवाजी महाराज की, जय” “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणा शिवप्रेमींकडून देण्यात येत होत्या. यावेळी फलटण शहरासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण तालुका शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या दरम्यान पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. बाईक रॅलीच्या सुरुवातीलाच फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बर्डे, शहर पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!