फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांचे २९ व ३० जूनला आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ८ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने फलटण तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा २०२४ चे शनिवार, दि. २९ जून व रविवार, दि. ३० जून असे दोन दिवस आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २९ जून रोजी वयोगट १८ वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी १००, ४०० व १६०० मीटर धावणे व गोळाफेक हे क्रीडा प्रकार होतील. तसेच १६ वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी १००, ४०० व ८०० मीटर धावणे व गोळाफेक हे क्रीडा प्रकार होतील आणि १४ वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी १००, ४०० व ६०० मीटर धावणे व गोळाफेक हे क्रीडा प्रकार होतील.

रविवार, दि. ३० जून रोजी वयोगट १२ वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी १००, २०० व ३०० मीटर धावणे हे क्रीडा प्रकार होतील. तसेच १० वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी ५०, ८० व १०० मीटर धावणे हे क्रीडा प्रकार होतील आणि ८ वर्षांच्या आतील मुले-मुली यांच्यासाठी ३० व ६० मीटर धावणे हे क्रीडा प्रकार होतील.

या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवेश फी रूपये ५०/- असून ती एका क्रीडा प्रकारास राहील. स्पर्धकांनी नावनोंदणीसह प्रवेश फी जमा करून आपले चेस नंबर दि. २४ जून ते २७ जून या कालावधीत सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत जिमखाना विभाग, मुधोजी महाविद्यालय, फलटण येथून घेऊन जावेत.

या स्पर्धांमधील प्रत्येक वयोगटातील प्रत्येक क्रीडा प्रकारातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक मेडल व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या स्पर्धा मुधोजी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित केल्या असून अधिक माहितीसाठी जनार्दन पवार (९२८४७६५९९५), नामदेव मोरे (९९६००८२१२०), अ‍ॅड. रोहित अहिवळे (९९६०८८५००७), राज जाधव (९२२६१३९६५३), प्रा. तायाप्पा शेंडगे (९३२२८४८१९९), धीरज कचरे (८३९०९९१९९९), सुहास कदम (७०८३७२०५२०) व सूरज ढेंबरे (८८०५७७७९९८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!