मुख्याधिकार्‍यांच्या हस्ते दोन सफाई कर्मचार्‍यांचा निरोप समारंभ संपन्न

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ८ जून २०२४ | फलटण |
अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहरच्या वतीने फलटण नगर परिषद दालनात शुक्रवार, दि. ७ जून रोजी दोन सफाई कर्मचार्‍यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्या हस्ते श्री. अनिल किसन डांगे व सौ. दीपमाला रमेश वाघेला या दोघांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष श्री. राजू मारुडा, उपमुख्य अधिकारी श्री. पाटील, कार्यालय अधीक्षक मुस्ताक महात, स्वच्छता निरीक्षक पी. के. तुळशे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संघटनेचे फलटण शहर अध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, युवा प्रकोषठा जिल्हाध्यक्ष सातारा आनंद डांगे, महामंत्री लखन डांगे, विनोद मारुडा, प्रकाश मारुडा, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, प्रदीप डांगे, बबलू डांगे, अजय मारुडा, रोहित मारुडा, सौ. हिराबाई मारुडा, सौ. राजश्री डांगे, सौ. मीनल डांगे, कल्पना वाळा, फलटण नगर परिषदेचे अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी, सफाई कर्मचारी या सर्वांनी श्री. अनिल डांगे व सौ. दीपमाला वाघेला या दोघांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!