फलटण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज तरडगाव ठरले विजेते

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२४ | फलटण |
जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्या वतीने रॉयल इंग्लिश मीडियम स्कूल जावली, ता. फलटण येथे झालेल्या फलटण तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १७ वर्षाखालील मुलांच्या गटात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूल व ज्यु. कॉलेज तरडगावच्या संघाने अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूलचा पराभव करून विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाची नेले (किडगाव), ता. सातारा येथे होणार्‍या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली.

या यशाबद्दल श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सविताकाकी सुभाषराव सूर्यवंशी(बेडके), संस्थेचे मानद सचिव डॉ. श्री. सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), नियामक मंडळाचे सदस्य श्री. महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी ( बेडके), नियामक मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्हि. बी. माने सर, पर्यवेक्षक एस. व्ही. क्षीरसागर सर सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती, पालक व तरडगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!