फलटण तालुक्यातील कोतवाल भरतीची १४ जुलै रोजी आरक्षण सोडत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १३ जुलै २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याबाबतचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार सध्या फलटण तालुक्यामध्ये एकूण १७ सजातील पदे रिक्त आहेत. या कोतवाल भरतीची आरक्षण सोडत निवड समितीच्या उपस्थितीत फलटण तहसील कार्यालय यांच्या दालनात शुक्रवार, दि. १४ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता काढण्यात येणार आहे.

फलटण तालुक्यातील कोतवाल पदे रिक्त असलेले सजा पुढीलप्रमाणे : आदर्की बु., हिंगणगाव, साठे, गोखळी, हणमंतवाडी, गुणवरे, वडले, गिरवी, तरडगाव, कुसूर, बरड, राजुरी, धूळदेव, वाठार निं., खामगाव, तडवळे व होळ (साखरवाडी).

या आरक्षण सोडतीस वरील गावांच्या सजातील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, ग्रामस्थ व इतरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कोतवाल निवड समिती अध्यक्ष तथा फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!