फलटण तालुका कराओके गायन स्पर्धेचे २१ ऑक्टोबर रोजी आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
अनुबंध कला मंडळ फलटण यांच्यातर्फे फलटण तालुका कराओके गायन स्पर्धेचे शनिवार, दि. २१ ऑटोबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेदरम्यान आयोजन केले आहे. ही स्पर्धा नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे संपन्न होणार आहे.

या स्पर्धेचे प्रवेश शुल्क १०० रूपये असून प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख २० ऑटोबर २०२३ रोजी सायंकाळी ६.०० पर्यंत आहे. या प्रवेशिका प्रॉमिस टेलर, कै. अशोक भोईटे चौक, फलटण येथे मिळतील.

या गायन स्पर्धेचे दोन गट असून प्रथम वयोगट ५ ते १५ वर्षे असून या गटातील प्रथम पारितोषिक विजेत्यास रू. १५०० रोख बक्षीस, द्वितीय विजेत्यास रू. १००० व तृतीय क्रमांकास रू. ५०० रोख बक्षीस दिले जाणार आहे.

दुसरा वयोगट १६ वर्षे वयापुढे असून यामधील प्रथम पारितोषिक विजेत्यास रू. ३००० रोख बक्षीस, द्वितीय विजेत्यास रू. २००० व तृतीय क्रमांकास रू. १००० रोख बक्षीस दिले जाणार आहे.

या गायन स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अनुबंध कला मंडळातर्फे करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!