फलटण: डॉक्टर राजेंद्र रुपनवर कार्यमुक्त – शिस्तभंगाची कारवाई

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांना गैरवर्तवणुकीच्या ठपका ठेवत वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने तातडीने कार्यमुक्त केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ३१ जुलै : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील तदर्थ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र रुपनवर यांना रुग्णालयातील गैरवर्तवणूक आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारणावरून तातडीने कार्यमुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लीला मडने यांनी कार्यमुक्त करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

गैरवर्तवणुकीचा गंभीर ठपका

प्रसाद प्रदीप कोंडेदेशमुख हे वैद्यकीय प्रमाणपत्राबाबत रुग्णालयात आले असता, रुपनवर यांनी त्यांच्याशी उद्घटपणे वर्तन केल्याची नोंद आदेशात करण्यात आली आहे. भ्रमणध्वनी क्रमांकाबाबत विचारणा केली असता अयोग्य भाषा वापरून पदाची प्रतिष्ठा घालवणारे कृत्य केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अहवाल

आरोग्य सेवा उपसंचालक पुणे आणि जिल्हा शल्य चिकित्सक सातारा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या वर्तणुकीमुळे संस्थेची नाहक बदनामी झाल्याचे नमूद करत रुपनवर यांना तात्काळ प्रभावाने कार्यमुक्त करून पुढील आदेशासाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Back to top button
Don`t copy text!