आसू गावच्या वेदिनी साबळे यांची जर्मनीतील उच्च शिक्षणासाठी निवड; विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

शेतकरी कुटुंबातील कन्येची उत्तुंग भरारी; डेगेनडोर्फ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एमएस करणार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : तालुक्यातील आसू येथील शेतकरी कुटुंबातील कुमारी वेदिनी अमोल साबळे यांची जर्मनीतील डेगेनडोर्फ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षांच्या एम. एस. (मास्टर ऑफ सायन्स) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेल्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल तिचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

कु. वेदिनी ही फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. तिने कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधून बी. फार्मसी आणि मुंबईतील भारती विद्यापीठातून एम.बी.ए. (फायनान्स) या पदव्या मिळवल्या आहेत. ती मुंबईतील मिलाग्रो क्लिनिकल रिसर्चच्या संचालिका डॉ. अंजली अमोल साबळे यांची सुकन्या आणि नीरा उजवा कालवा विभागाचे सेवानिवृत्त कालवा निरीक्षक बाबासाहेब साबळे यांची नात आहे.

या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गोविंद मिल्कच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर आणि श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे यांनी कु. वेदिनी साबळे हिचे अभिनंदन करून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!