गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान; दत्तक योजनेत ५ टक्के जागांची प्रियदर्शनी भोसलेंची मोठी घोषणा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटणच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव. दत्तक विद्यार्थी योजनेत ५ टक्के जागा राखीव ठेवण्याची प्रियदर्शनी भोसलेंची मोठी घोषणा.

स्थैर्य, फलटण, दि. ०४ ऑगस्ट : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालयात विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. यावेळी ब्रिलियंट अकॅडमीच्या दत्तक विद्यार्थी योजनेत ५ टक्के जागा समाजासाठी राखीव ठेवण्याची मोठी घोषणा फलटण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले यांनी केली.

शिष्यवृत्तीचे वाटप

दानशूर व्यक्तींच्या देणगीतून जमा झालेल्या निधीतून होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच दहावी आणि बारावीमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रियदर्शनी भोसले यांनी शालेय जीवनातील जडणघडणीचे भविष्यातील जीवनावरील महत्त्व विशद केले.

आदर्श जीवनशैलीचे मार्गदर्शन

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. ओ. जी. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आदर्श जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या धोरणांचा आढावा घेत नवीन कार्यकारिणीची ओळख करून दिली. सूत्रसंचालन स्नेहल तगारे आणि श्रुती इनामदार यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, देणगीदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!