गौरी गणपतीसाठी फलटणमध्ये ‘SHGs मार्ट’; महिला बचत गटांची उत्पादने एकाच ठिकाणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

गौरी गणपती उत्सवानिमित्त फलटण नगरपरिषद प्रांगणात १६ सप्टेंबर रोजी ‘SHGs मार्ट’ भरवण्यात येणार असून महिला बचत गटांची विविध उत्पादने येथे उपलब्ध असतील.

स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर : गौरी गणपती उत्सवानिमित्त फलटण नगरपरिषद अंतर्गत दीनदयाळ जनआजीविका योजना (DAY-NULM) आणि आत्मनिर्भर शहर स्तर संघ, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, १६ सप्टेंबर रोजी फलटण नगरपरिषद प्रांगणात ‘SHGs मार्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांची खरेदी नागरिकांना एकाच ठिकाणी करता येणार आहे.

महिला बचत गटांची उत्पादने होलसेल दरात

या एकदिवसीय बाजारात महिला बचत गटांनी तयार केलेले सेंद्रिय, स्वच्छ आणि घरगुती चवीचे खाद्यपदार्थ तसेच विविध घरगुती उत्पादने होलसेल दरात उपलब्ध होणार आहेत. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत डॉ. आंबेडकर चौकातील फलटण नगरपरिषद प्रांगणात हा बाजार सुरू राहणार आहे.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन

गौरी गणपतीच्या खरेदीसोबत महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या विशेष बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. फलटणकरांनी कुटुंबासह बाजाराला भेट देऊन महिला बचत गटांची उत्पादने खरेदी करावीत आणि त्यांच्या उद्योगशीलतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!