सातारा जिल्ह्यात १ ते १२ नोव्हेंबर दरम्यान शस्त्र व जमावबंदी लागू; प्रशासनाचे कडक आदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते १२ नोव्हेंबर या कालावधीसाठी शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे कडक आदेश जारी केले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. ३१ ऑक्टोबर : सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडून १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

शस्त्र व स्फोटक पदार्थ बाळगण्यास मनाई

या आदेशानुसार, कालावधीत शस्त्रे, तलवारी, भाले, बंदुका, सुऱ्या, लाठ्या-काठ्या किंवा शारीरिक इजा करू शकणाऱ्या कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. यासोबतच फटाके वगळता इतर कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेण्यास किंवा बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. दगड, अस्त्र किंवा फेकावयाची हत्यारे गोळा करणे किंवा बरोबर नेण्यासही प्रशासनाने मज्जाव केला आहे.

सार्वजनिक शांतता राखण्यासाठी निर्बंध

कोणत्याही व्यक्तीचे प्रेत किंवा प्रतिमांचे सार्वजनिक प्रदर्शन करण्यावर बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे, तसेच ज्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे किंवा सोंग आणण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कृती केल्यास त्या व्यक्तीवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार आहे.

अपवाद आणि सवलती

हा आदेश काही विशिष्ट प्रकरणांमध्ये लागू असणार नाही. ज्यांना शारीरिक दुर्बलतेमुळे लाठी किंवा काठी वापरण्यास सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी आहे, त्यांच्यावर हे निर्बंध नसतील. तसेच यात्रा, धार्मिक कार्य, लग्नविधी किंवा अंत्यविधीसाठी हा आदेश लागू होणार नाही. दिवाळी सणासाठी परवानाधारक फटाके विक्रेते आणि सामान्य नागरिकांना फटाक्यांची वाहतूक, साठा आणि विक्रीसाठीही यातून वगळण्यात आले आहे. शांततेच्या मार्गाने पूर्वपरवानगी घेऊन कार्यक्रम करणाऱ्यांनाही हे आदेश लागू होणार नाहीत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!