फलटण | शरद पवारांच्याकडून तालुक्यातील दलित चळवळीतील कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २३ ऑगस्ट २०२४ | फलटण | तालुक्यामध्ये विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जे काही दलित कार्यकर्ते कामकाज करीत आहेत. अश्या सर्व कार्यकर्त्यांना माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी भेटीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे समर्थक नंदकुमार मोरे यांनी दिली आहे.

फलटण येथे संपन्न होणाऱ्या मेळाव्याचे निमंत्रण देताना नंदकुमार मोरे.

नुकतीच नंदकुमार मोरे यांनी पुणे येथे मोदी बागेत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार व युवा नेते आमदार रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी शरदचंद्र पवार व रोहितदादा पवार यांना फलटण येथे संपन्न होणाऱ्या संविधान समर्थन समितीच्या वतीने बौद्ध मेळाव्याचे निमंत्रण सुद्धा दिले आहे. जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी सदरील मेळाव्यास शुभेच्छा दिल्या असून त्या दिवशी सुद्धा शरदचंद्र पवार हे दूरध्वनीद्वारे शुभेच्छा व्यक्त करणार असल्याची माहिती सुद्धा मोरे यांनी दिली.

 

Back to top button
Don`t copy text!