आशियाई हॉकी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ऋतुजा पिसाळ हिचा फलटणमध्ये उत्साहात सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी फलटणची सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ हिचा काळूबाई नगर नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नगरसेवक अशोकराव जाधव आणि माजी नगरसेविका विजयाताई जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

स्थैर्य, फलटण, दि. २० ऑक्टोबर : आशियाई हॉकी स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या फलटणच्या ऋतुजा पिसाळ हिचा काळूबाई नगर येथे विशेष सत्कार करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सत्कार समारंभामध्ये क्रीडा क्षेत्रातील तिच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात नागरिक आणि महिलांची उपस्थिती

नगरसेवक अशोकराव जाधव आणि माजी नगरसेविका विजयाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी काळूबाई नगरमधील सर्व महिला, लहान मुले, मुली आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऋतुजा पिसाळ हिच्या या यशाबद्दल उपस्थितांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव व आभार प्रदर्शन

गेले आठ दिवस काळूबाई नगरमध्ये लहान मुलांच्या विविध स्पर्धा पार पडल्या. यामध्ये संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचा समावेश होता. या सर्व स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना नवरात्रोत्सवादरम्यान गौरविण्यात आले. नऊ दिवस चाललेल्या या उत्सवास नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसाताबद्दल नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!