
थेट WhatsApp वर मिळवा
माढा मतदारसंघातील श्री निमजाईदेवी मंदिर येथे आयोजित नवरात्रोत्सवात माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर पाऊस बरसावा, अशी प्रार्थना करण्यात आली.
स्थैर्य, निंबळक, दि. २० ऑक्टोबर : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि सौ. जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते श्री निमजाईदेवीची विधिवत आरती संपन्न झाली. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या धार्मिक कार्यक्रमात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यात पडलेल्या दुष्काळाच्या झळा शेतकरी वर्ग आणि सामान्य जनतेला बसू नयेत, तसेच लवकरच चांगल्या प्रकारचा पाऊस बरसावा, अशी साकडे यावेळी देवीचरणी घालण्यात आले. मंदिर परिसराच्या विकासाबाबत आणि तेथील धार्मिक वातावरणाबाबतही यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
निमजाईदेवी मंदिराचा विकास आणि धार्मिक महत्त्व
श्री निमजाईदेवी मंदिराच्या उभारणीचे भव्य आणि दिव्य काम रामसाहेब निंबाळकर यांनी अत्यंत यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे. या कामामुळे निंबळक गावाला एका महत्त्वाच्या धार्मिक स्थळाचा दर्जा प्राप्त झाला असून, रामसाहेब निंबाळकर यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचे जितके आभार मानले जावेत तितके थोडेच आहेत, असे मत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.




