नवरात्रौत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींचे विसर्जन कालव्यात न करता त्या फलटण नगर परिषदेकडे सुपूर्त कराव्यात : नगराध्यक्ष समशेरसिंह

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण शहरात नीरा उजव्या कालव्यात पाणी नसल्याने देवीच्या मूर्तींचे विसर्जन पालिकेकडे करण्याचे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑक्टोबर : संपूर्ण राज्यासह फलटण शहरात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नीरा उजवा कालव्याचे आवर्तन सध्या बंद आहे. त्यामुळे नवरात्रौत्सव मंडळांनी देवीच्या मूर्तींचे विसर्जन कालव्यात न करता त्या फलटण नगर परिषदेकडे सुपूर्त कराव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.

मूर्ती विटंबना टाळण्यासाठी निर्णय

नीरा उजव्या कालव्याचे आवर्तन बंद असल्याने सध्या कालव्यामध्ये पाणी नाही. अशा परिस्थितीत देवीचे विसर्जन कालव्यात केल्यास मूर्तीची विटंबना होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मूर्ती विसर्जनाबाबत हा नवा पर्याय सुचवला आहे.

पालिकेच्या माध्यमातून विधिवत विसर्जन

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी देवीच्या मूर्ती पालिकेकडे सुपूर्त केल्यानंतर त्यांची योग्य ती काळजी पालिकेच्या माध्यमातून घेतली जाईल. नीरा उजवा कालव्याचे आवर्तन पुन्हा सुरू झाल्यानंतर या मूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी मूर्ती पालिकेकडे सुपूर्त कराव्यात, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!