स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 6, 2021
in फलटण तालुका, सातारा जिल्हा

स्थैर्य, फलटण, दि.५ : ताथवडा घाटामध्ये नियमित पेट्रोलिंग करत असताना फलटण ग्रामीण पोलिसांना ताथवडा घाटामधील दुसऱ्या वळणाजवळ सहा जण संशयित्या थांबल्याचे आढळून आले. सदरील इसमांना फलटण ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंनी घेरले असता त्यामधील दोघा जणांना पळून जाण्यामध्ये यश आलेले आहे. ताथवडा गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ताथवडा घाटामध्ये दरोडा टाकून सुमारे 80 हजार रुपये व हत्यारे ही त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेली आहेत व चौघा जणांना जेलबंद करण्यात आलेले आहे, अशी माहिती फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश बाजीराव मदने, राजापूर, ता. खटाव, जि. सातारा, सनी उर्फ सोन्या धनाजी भूलकर, रा. चौधरवाडी, ता. फलटण, प्रथमेश उर्फ सोनू हनुमंत मदने, रा. उपळवे ता. फलटण, किशोर हनुमंत जाधव, रा. ताथवडा, ता. फलटण व पळून गेलेले इसम महेश उर्फ दत्तात्रय शिरतोडे, रा. मोती चौक, फलटण, किरण मदने रा. राजापूर ता. खटाव जि. सातारा असे एकूण सहा जण मिळून ताथवडा घाटामध्ये दरोडा टाकत होते. त्यांच्याकडून 80 हजार रुपयांचा माल व जवळ असलेली सर्व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहेत. ताथवडा घाटामध्ये असणाऱ्या रस्त्यावर ये-जा करणार्‍या माणसांवर दरोडा घालण्याच्या तयारीनिशी सदरील सहा जण एकत्र मिळून आले. व छाप्याच्या वेळी दोघे जण पळून गेले तर चौघांना जागीच पकडले आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

सदरची कामगिरीही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलिस अधीक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बोंबले, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस नाईक देवकर, तुपे चालक यादव, पोलीस कॉन्स्टेबल कुंभार, पोलीस नाईक काशीद, पोलीस कॉन्स्टेबल जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल पाटोळे यांनी केलेली आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

Next Post

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

Next Post

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,033 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना मोफत धान्य जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

April 22, 2021

५४% भारतीय विद्यार्थी म्हणतात ऑनलाइन शिक्षणाचे मॉडेल सोयीस्कर : ब्रेनली

April 22, 2021

पालकमंत्र्यांची मालखेड येथील रोपवाटिकेला भेट; रोजगार हमी योजनेच्या कामाची केली पाहणी

April 22, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करणार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती

April 22, 2021

शेतकऱ्यांच्या सहाय्यासाठी शाश्वत सिंचन सुविधा उभारणार – जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू

April 22, 2021
परळी ता. सातारा येथे कोरोना मदत केंद्राचे उदघाटन करताना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले. शेजारी राजू भोसले, सौ. सरिता इंदलकर, अरविंद जाधव, सौ. विद्या देवरे व इतर मान्यवर

कोरोनाला आळा घालण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – आ. शिवेंद्रसिंहराजे

April 22, 2021

फलटण तालुक्यातील २९३ तर सातारा जिल्ह्यातील १८१५ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; २८ बाधितांचा मृत्यु

April 22, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारचे जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी

April 22, 2021

फलटणमध्ये विद्युत स्मशानभूमी करा; नगरसेवक अशोकराव जाधव यांची मागणी

April 22, 2021

गरजू रुग्णास तात्काळ बेड उपलब्ध करुन द्या – पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम

April 22, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

कॉपी करू नका.