सहा वर्षांपासून फरार असलेल्या तिघा आरोपींना फलटण ग्रामीण पोलिसांकडून अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२४ | फलटण|
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातील विविध कलमांखाली दाखल गुन्ह्यातील गेल्या वर्षांपासून फरार असलेल्या तिघा आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून फलटण ग्रामीण पोलिसांनी आज अटक केली. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

बंद कुलिया उर्फ गोविंद भगवान काळे (वय ७०), लाकड्या भगवान काळे (वय ३०) व पिंगा पुण्या काळे (वय ३५, सर्व राहणार सोनवडी, तालुका फलटण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत की, जेवढेही रेकॉर्डवरील फरारी व वाँटेड आरोपी आहेत त्यांना जास्तीत जास्त आरोपींना अटक करावी.

वरिष्ठांच्या आदेशानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार शांतीलाल ओमासे, पोलीस नाईक तात्या कदम, पोलीस अंमलदार अमोल जगदाळे, दडस, नितीन चतुरे यांची टीम तयारी केलेली आहे.

पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये २० फेब्रुवारी रोजी पहाटे कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले. त्यावेळी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे गुन्हा नंबर २८/ २०१८ कलम १४३ १४७ १४८ ३२५ ३२४ ३२३ ५०४ भादवि सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) १३५ गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या वरील तिघा आरोपींना अटक केली. याही पुढे फलटण ग्रामीण पोलिसांतर्फे पाहिजे व फरारी आरोपींचा कसोशीने शोध घेण्यात येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!