कृषीकन्यांकडून किटकनाशक फवारणीवर प्रात्यक्षिक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२४ | फलटण|
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कीटकनाशक फवारणी विषयावर प्रात्यक्षिक करून दाखविले.

या कार्यक्रमाअंतर्गत सोनगाव, ता. फलटण येथे कृषीकन्यांनी वांग्यावरील कीड नियंत्रणा संबंधित कीटकनाशक फवारणी कशी करावी आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे मॅडम, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या हर्षल भालघरे, प्रितल भोसले, प्रेरणा खोपडे, वैष्णवी पिसाळ, भाग्यश्री राऊत, नेहा साळुंखे, नंदिनी शिंदे या कृषीकन्यांनी हा कार्यक्रम पार पाडला.

Back to top button
Don`t copy text!