
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. 28 जुन 2024 | फलटण | फलटण ते पंढरपूर व फलटण ते बारामती ह्या रेल्वे प्रकल्पाला कसलाही निधी कमी पडू देणार नाही. येणाऱ्या काळात फलटण ते पंढरपूर व फलटण ते बारामती ह्या रेल्वे प्रकल्पासाठी आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांनी दिली.
नवी दिल्ली येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे मंत्री ना. अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव बोलत होते.
