
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
महाबळेश्वर नगर परीषद आयोजित नगरपरिषद कर्मचारी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत महिला कबड्डीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून तृतीय क्रमांक पटकावून फलटण नगरपरिषदेचे नाव राज्य स्तरावर उंचवल्याबददल महिला कबड्डी संघाचे अभिनंदन विविध स्तरातून होत आहे.
महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीने विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धसाठी फलटण नगर परिषद महिला संघाने कब्बडी या क्रीडा प्रकारात भाग घेऊन राज्यात तृतीय क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संजय गायकवाड यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी आरोग्य निरीक्षक विनोद जाधव, शिवभोला काकडे, सचिन घोलप (पप्पू) उपस्थित होते.
