दैनिक स्थैर्य । दि. ०८ फेब्रुवारी २०२१ । फलटण । गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन झाल्याने केंद्र सरकारने व राज्य सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलेला आहे. राष्ट्रीय दुखवटा या दरम्यान आपल्या देशाचा ध्वज फडकवत न ठेवता अर्ध्यावर आणून ठेवण्याबाबतचे निर्देश सदरील आदेशामध्ये पारित करण्यात आलेले आहेत. तरी फलटण नगरपरिषदेला राष्ट्रीय दुःखवट्याचा व लता मंगेशकर यांच्या निधनाचा विसर पडल्याचे दिसून आले. नगर परिषदेच्या जुन्या इमारती समोर असलेल्या ध्वज फडकवत ठेवल्याने फलटण शहरासह तालुक्यांमधील संगीतप्रेमी हे याबाबत नाराज झाले असल्याचे दिसुन आले.
गानकोकिळा व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सोमवार दि. ०७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केलेली होती. व दुखवट्यामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज हा फडकवत न ठेवता अर्धावर आणुन ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आलेले होते. परंतु फलटण नगरपरिषदेला त्याचा विसर पडला असुन राष्ट्रध्वज हा नेहमी प्रमाणे फडकवलेला होता.
दुखवट्यामध्ये राष्ट्रध्वज हा ध्वज दंडाच्या निम्म्या ठिकाणी आणला जातो, परंतु फलटण नगरपरिषदेच्या आवारात मधील राष्ट्रध्वज हा नेहमीप्रमाणे ध्वज दंडावर फडकत होता.