पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपरिषदेचा पाणीपुरवठा विभाग सज्ज


दैनिक स्थैर्य । 24 जून 2025 । फलटण । फलटण नगरपरिषद दरवर्षी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सोयी – सुविधांसाठी तत्पर असते. पालखी सोहळ्यानिमित्त येणाऱ्या दिंड्या व भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो.

फलटण नगर परिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे राहुल काकडे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी स्थळावर पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाणीपुरवठ्याचे नेटके नियोजन केले आहे.

पाणीपुरवठ्याचे चांगले नियोजन करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांनी दिल्या आहेत. एकाच वेळी आठ टँकर भरतील अशी व्यवस्था पाणी पुरवठा विभागाने केली आहे. सर्व भाविकांना शुद्ध आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी मिळावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभाग सज्ज झाला आहे.

सर्व वारकरी, भाविकांना स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन दिले जाईल याची दक्षता त्यांनी घेतली आहे. सध्या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा विभागामार्फत सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे.


Back to top button
Don`t copy text!