फलटण नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण


स्थैर्य, फलटण, दि. ८: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक व इतर सर्व कार्यक्रमांना फाटा देत फलटण नगर परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त फलटण येथील स्मशानभूमी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी स्वयंसिद्धा महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा व फलटण नगर परिषदेच्या जलनिस्सारण पाणी पुरवठा समितीच्या सभापती अ‍ॅड. सौ. मधूबाला भोसले, नगरसेविका सौ.प्रगती कापसे , नगरसेविका सौ.सुवर्णा खानविलकर, नगरसेविका सौ.दिपाली निंबाळकर, स्वयंसिद्धा औद्योगिक संस्थेच्या चेअरमन सौ. राजस भोईटे, सौ. स्वाती फुले आदी महिला उपस्थित होत्या.


Back to top button
Don`t copy text!