चायनीज मांजा विकल्यास थेट दुकान परवाना रद्द; फलटण नगरपरिषदेचा व्यापाऱ्यांना मोठा इशारा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा फलटण नगरपरिषदेने दिला आहे. मांजा विकल्यास थेट दुकान परवाना रद्द केला जाणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : नागपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चायनीज आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. शहरात कोणीही व्यापारी किंवा दुकानदार हा मांजा विकताना आढळल्यास त्यांचा दुकान परवाना थेट रद्द करण्याचा मोठा निर्णय फलटण नगरपरिषदेने घेतला आहे.

पशु-पक्षी आणि नागरिकांच्या जिवाला धोका शहरामध्ये १७ ऑगस्ट रोजी येणाऱ्या नागपंचमी सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले जातात. यासाठी चायनीज किंवा नायलॉन मांजाचा सर्रास वापर केला जातो. या धारदार मांजामुळे अनेकदा नागरिक, लहान मुले तसेच पशु-पक्ष्यांच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नगरपरिषदेने ही खबरदारी घेतली आहे.

कायदेशीर कारवाईचा मुख्याधिकाऱ्यांचा इशारा शहरातील कोणत्याही दुकानात, गाळ्यामध्ये किंवा घरातून चायनीज व नायलॉन मांजाची विक्री केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांचा व्यवसाय परवाना तात्काळ रद्द करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Back to top button
Don`t copy text!