

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला असला तरी फलटण तालुक्यात अद्याप उकाडा कायम आहे. ६ जून रोजी झालेल्या अंशतः पावसानंतर ७ जून रोजी पावसाने पूर्ण ओढ दिली.
स्थैर्य, फलटण, दि. 08 जून : महाराष्ट्रात मान्सूनचे अधिकृत आगमन झाले असले तरी फलटण तालुक्यात अद्यापही तीव्र उकाडा जाणवत असून नागरिकांना उष्णतेपासून सुटका मिळालेली नाही. तालुक्यात ६ जून रोजी सरासरी ९.८ मिमी पावसाची नोंद झाली होती, मात्र ७ जून रोजी पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने फलटणकर आता दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
६ जून रोजी विविध मंडळांत झालेला पाऊस
महसूल विभागाच्या पर्जन्यमान अहवालानुसार, ६ जून रोजी फलटण तालुक्यात ९.८ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली. यामध्ये प्रामुख्याने आसू मंडळात २६.३ मिमी आणि गिरवी मंडळात १८.८ मिमी पाऊस झाला. याशिवाय होळ, वाठार आणि कोळकी महसूल मंडळात प्रत्येकी १०.३ मिमी पाऊस झाला, तर तरडगावमध्ये २.३ मिमी, आदर्कीत ३ मिमी आणि बरड व राजळे येथे प्रत्येकी ३.५ मिमी पावसाची नोंद झाली होती.
७ जून रोजी पावसाची दांडी
७ जून रोजी मान्सून राज्यात दाखल झाला असला तरी फलटण तालुक्यातील सर्व १० महसूल मंडळांमध्ये रविवारी पावसाने पूर्णपणे दांडी मारली. सर्व मंडळांमध्ये ०.० मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्याचा एकूण प्रगतीशील पाऊस १९.६ मिमीवर स्थिर आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण न झाल्याने तालुक्यात कमालीचा उकाडा वाढला असून शेतकरी आता मोठ्या पावसाची वाट पाहत आहेत