रासायनिक खत खरेदीसाठी ‘एफएफएफएस’ प्रणाली राज्यभर लागू; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

शेतकऱ्यांना सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने खत खरेदी करता यावी यासाठी केंद्र शासनाची ‘एफएफएफएस’ प्रणाली संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २५ ऑक्टोबर : राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खत खरेदीची प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएफएस) प्रणाली संपूर्ण राज्यभर लागू करण्यात आली आहे. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना आता खतांच्या उपलब्धतेची माहिती थेट मोबाईलवर मिळणार असून रांगेत उभे राहण्यापासून सुटका होणार आहे.

खरेदी प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक

शेतकऱ्यांनी हे मोबाईल ॲप डाउनलोड केल्यानंतर जवळच्या खत विक्री केंद्रांवरील साठा आणि दराची माहिती सहज पाहता येते. तसेच शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खतांची आगाऊ नोंदणी (बुकिंग) करण्याची सुविधाही यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे खतांच्या छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होणे आणि इतर निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती यांसारख्या प्रकारांना प्रभावीपणे आळा बसणार आहे.

काळ्या बाजाराला बसणार चाप

नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरलेली ही प्रणाली आता राज्यभरात कार्यान्वित झाली असून यामुळे खतांचा काळाबाजार रोखण्यास मोठी मदत होणार आहे. यासंदर्भात काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!