फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर तेजीत; कमाल भाव ४८०० रुपयांवर

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून कमाल दर ४८०० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १३ : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात मंगळवारी भरलेल्या लिलावात कांद्याच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बाजारात १५१४ पिशव्यांची म्हणजेच एकूण ७५७ क्विंटल कांद्याची आवक झाली असून, कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ४८०० रुपये इतका चांगला भाव मिळाला आहे.

कांदा बाजारात तेजीची स्थिती

फलटण मार्केट यार्डात कांद्याची आवक स्थिर असली तरी मागणी जास्त असल्याने दरामध्ये सुधारणा झाली आहे. लिलावा दरम्यान कांद्याला किमान २००० रुपये तर सरासरी ३३००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. कमाल भाव ४८०० रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

उत्पादकांना दिलासा

गेल्या काही दिवसांच्या तुलनेत बाजारात कांद्याचे भाव तेजीत राहिल्याने दूरवरून माल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना चांगला आर्थिक दिलासा मिळाला आहे. आगामी दिवसांतही कांद्याची मागणी आणि दर टिकून राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!