
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे भाव कमाल ५००१ रुपयांपर्यंत पोहोचले असून इतर शेतमालाचीही आवक वाढली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑक्टोबर : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात कांद्याचे दर तेजीत असून कमाल भाव प्रतिक्विंटल ५००१ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. बाजारात कांद्याची १५०० पिशवी आवक झाली असून सरासरी ३००० रुपये भाव मिळाला आहे.
कांदा बाजारातील स्थिती
६ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या लिलावात कांद्याला किमान १५०० रुपये, कमाल ५००१ रुपये आणि सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याचे दर तेजीत राहिल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर प्रमुख शेतमालाचे घाऊक बाजारभाव
४ ऑक्टोबर रोजी मुख्य बाजारात ज्वारीची ४२ क्विंटल आवक होऊन ३४०० ते ६३०० रुपये भाव मिळाला. गव्हाची ३१४ क्विंटल आवक झाली असून २६०० ते २९४५ रुपये दर राहिला. मक्याची १९१ क्विंटल आवक होऊन २४५० ते २७०० रुपये तर बाजरीची १७८ क्विंटल आवक होऊन २५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. कडधान्यांमध्ये पिवळ्या मुगाला १०००० ते १६००० रुपये आणि हिरव्या मुगाला ७५०० ते १०००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. याशिवाय उडीद ७५०० ते ९५०० रुपये आणि हरभरा ६००० ते ७४५० रुपये दराने विकला गेला.



