फलटणमध्ये पारंपरिक नवरात्र व दसरा महोत्सव उत्साहात संपन्न; सीमोल्लंघन सोहळ्याने सांगता

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने आयोजित नवरात्र व दसरा महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.

स्थैर्य, फलटण, दि. २३ ऑक्टोबर : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने फलटण येथे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेला नवरात्र व दसरा महोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

माळजाई मंदिर परिसराची आकर्षक सजावट, देवीची मनमोहक आरास आणि विद्युत रोषणाई यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला होता. उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नेटके व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात महिला भाविकांसह फलटणकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

महोोत्सवाच्या काळात दररोज सकाळी देवीचा विधिवत अभिषेक, महाआरती आणि दुपारच्या सत्रात महिला मंडळांच्या वतीने भजन, कीर्तन व श्रीसूक्त पठण झाले. सायंकाळच्या सत्रात आयोजित दांडिया कार्यक्रमामुळे परिसरात मोठा उत्साह पाहायला मिळाला. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी लायन्स क्लब परिवार आणि मंदिर समितीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न

उत्सवादरम्यान विविध दिवशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला विशेष प्रतिष्ठा लाभली.

पारंपरिक दसरा सोहळ्याने सांगता

नवरात्रोत्सवाच्या समारोपानिमित्त आयोजित दसरा महोत्सवात फलटण नगरीचे ग्रामदैवत प्रभू श्रीरामचंद्र यांचा पारंपरिक रथ राजवाड्यातून माळजाई मंदिर परिसरात दाखल झाला. अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विधिवत पूजन व सीमोल्लंघन सोहळा पार पडला. यानंतर उपस्थितांना आपट्याची पाने वाटप करण्यात आली व मंगलमय वातावरणात महोत्सवाची सांगता झाली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!