फलटण | माजी खासदार रणजितसिंह यांच्यामाध्यमातून शहरात “लाडकी बहिण” योजना यशस्वी; बँक खात्यात पैसे जमा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या कार्यालयात भरण्यात आले होते. लाडकी बहीण योजनेसाठी माजी नगरसेवक अनुप शहा यांच्या कार्यालयात एकूण ८०० फॉर्म भरण्यात आले होते. सदरील सर्वच्या सर्व माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे रुपये ३ हजार अनुदान प्राप्त झाले असल्याची माहिती माजी नगरसेवक अनुप शहा यांनी दिली.

सर्वसामान्य माता भगिनींना ऐन सणासुदीमध्ये लाडकी बहीण योजनेचे अनुदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजितदादा पवार व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार माजी नगरसेवक अनुप शहा यांनी यावेळी मानले.

Back to top button
Don`t copy text!