
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ५ डिसेंबर २०२३ | फलटण |
भारतीय जनता पार्टी च्या वतीने फलटण-कोरेगाव विधानसभा बैठक बुधवार, दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर व जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम व जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत कोळकी विश्रामगृह (रेस्ट हाऊस) येथे माढा लोकसभा प्रवासानिमित्त आयोजित करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे हे आपल्या दौर्यामध्ये सुपर वॉरियर व प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत संवाद करणार आहेत, त्यानिमित्त सराव आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस भाजपाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन बजरंग गावडे व अमोल सस्ते यांनी केले आहे.
