फलटण – मोगराळे रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२१ । फलटण । फलटणहून दहिवडीकडे जाणार्‍या रस्त्यावर फलटण – मोगराळे दरम्यानच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे.

या मार्गावरील घाट माथा ते शितल ढाब्यापर्यंतचा रस्ता डांबर उखडल्याने खड्डेमय झाला असून या ठिकाणाहून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेवून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!