फलटणमध्ये घरगुती गणपती विसर्जनासाठी कृत्रिम टॅंक; ज्येष्ठांसाठी विशेष सोय

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

फलटण शहरातील पाच व सात दिवसांच्या घरगुती गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने दोन ठिकाणी कृत्रिम टॅंक आणि निर्माल्य कलशांची व्यवस्था केली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. १८ सप्टेंबर : फलटण शहरासह उपनगरातील पाच व सात दिवसांच्या घरगुती गणपती विसर्जनासाठी फलटण नगर परिषदेने यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात आणि सांस्कृतिक भवनाजवळ कृत्रिम टॅंक उभारले आहेत. नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही सोयीची व्यवस्था

घरगुती गणपतींचे विसर्जन नागरिकांना सोयीस्कर पद्धतीने करता यावे आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम टॅंक उभारण्यात आले असून, निर्माल्य जमा करण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलशही ठेवण्यात आले आहेत.

नगर परिषद करणार विधिवत विसर्जन

कृत्रिम टॅंकच्या ठिकाणी जमा होणाऱ्या गणेशमूर्तींचे फलटण नगर परिषदेच्या वतीने विधिवत विसर्जन केले जाणार आहे. पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन करणाऱ्या नागरिकांनी यशवंतराव चव्हाण हायस्कूल किंवा सांस्कृतिक भवनाजवळील सुविधेचा वापर करावा, असे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!