भाडळी बु. येथील जि. प. शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
भाडळी बु. (ता. फलटण) येथील जि. प. शाळेचे सन २०२३-२४ यावर्षीचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्‍या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद केंद्रशाळा, दुधेबावीचे केंद्रप्रमुख तसेच उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी यावेळी वेगवेगळ्या गाण्यांवरती नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमप्रसंगी गावातील महिलांनी उपस्थित राहून उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील तरुणांनी विशेष योगदान दिले. यावेळी भाडळी बु. ग्रामपंचायत, मातोश्री विकास सेवा सोसायटी भाडळी बु., शालेय व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, शिक्षणप्रेमी, दुधेबावी केंद्रातील शिक्षक, शिक्षिका, शाळेचे माजी शिक्षक, ग्रामस्थ महिला तरुण वर्ग उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनीच शाळेचे शिक्षक श्री. सुनील खरात आणि श्री. अमित जाधव आणि अंगणवाडी विभागाच्या सौ. माने मॅडम यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. सुनील खरात आणि श्री. बाळकृष्ण मोरे यांनी केले. उपस्थितांचे स्वागत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. तानाजी सावंत आणि सहकार्‍यांनी केले तर श्री. अमित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!