दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे फलटण शहराला पाणीपुरवठा करणार्या योजनेतून शहराला पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. म्हणून फलटण नगर परिषदेने पाणीपुरवठ्यासंदर्भात एक जाहीर प्रकटन दिले आहे.
या जाहीर प्रकटनात नगर परिषदेने नागरिकांना आवाहन केले आहे की, फलटण शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा कमी दाबाणे व उशिरा होईल व यासाठी नगर परिषदेस नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. संजय गायकवाड यांनी केले आहे.