
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी २५ ऑटोबर २०२३ पासून आंतरवाली सराटी, ता. अंबडा, जि. जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चाने साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यास फलटण शहर सिंधी समाजाने आंदोलनस्थळी जाऊन जाहीर पाठिंबा दिला.
