

फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीतील रविवार, ७ जून रोजीचे शेतमालाचे अधिकृत बाजारभाव जाहीर झाले आहेत. मुख्य बाजारात गव्हाची सर्वाधिक आवक झाली असून इतर शेतमालाचे दर स्थिर आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 08 जून : फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारातील रविवार, ७ जून रोजीचे शेतमालाचे अधिकृत घाऊक बाजारभाव जाहीर करण्यात आले आहेत. बाजारात गव्हाची सर्वाधिक ६९१ क्विंटल आवक झाली असून इतर धान्यांचीही आवक समाधानकारक आहे.
शेतमालाचे अधिकृत घाऊक बाजारभाव
बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, विविध शेतमालाचे किमान आणि कमाल दर (रुपये प्रति क्विंटल) आणि कंसात आवक (क्विंटलमध्ये) खालीलप्रमाणे आहेत:
-
ज्वारी – २५०० ते ५८०० (८८)
-
बाजरी – २३०० ते ३१०० (६२)
-
गहू – २२०० ते २९१० (६९१)
-
उडीद – ७२०० (१)
-
हरभरा – ५५०० ते ६२०० (११९)
-
मका – १७०० ते २२६५ (१०३)
-
मूग – ६००० ते ९५०० (४)
-
घेवडा – ६००० ते ७५०० (४०)
-
खपली – ३८०० ते ३९०० (२)
-
चवळी – ७५०० ते ७६०० (२)