फलटणच्या कृषी विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत मोठी झेप; जनरल चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या क्रीडा स्पर्धेत फलटणच्या उद्यानविद्या आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनरल चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

स्थैर्य, फलटण, दि. 03 ऑक्टोबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मिरजगाव येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती, शरीरसौष्ठव व वजन उचलणे स्पर्धेत फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या आणि कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिपमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

उद्यानविद्या महाविद्यालयाचे यश

कुस्ती स्पर्धेत श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचा विद्यार्थी युवराज सुतार याने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळवला, तर सुजित मारकड याने द्वितीय क्रमांक पटकावला. शरीरसौष्ठव स्पर्धेत सुजल सुतार याने द्वितीय क्रमांक आणि वजन उचलणे स्पर्धेत हर्षवर्धन वगेरे याने चतुर्थ क्रमांक मिळवत महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.

कृषी महाविद्यालयाची चमकदार कामगिरी

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. कुस्तीमधील ५७ किलो वजन गटात अभिजीत राजगे याने तृतीय, तर ६५ किलो गटात शिवतेज शिंदे याने द्वितीय क्रमांक मिळवला. शरीरसौष्ठव स्पर्धेत ६५ किलो गटात मृत्यूंजय शिताप याने चतुर्थ क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंना क्रीडा अधिकारी प्रा. रोशन सोडमिसे आणि प्रा. नवनाथ खुरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.

मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

या दैदिप्यमान यशाबद्दल रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर, विश्वजितराजे नाईक निंबाळकर, सत्यजितराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर आणि डॉ. यू. डी. चव्हाण यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे विशेष कौतुक केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!