
थेट WhatsApp वर मिळवा
फलटण तालुक्यातील फेब्रुवारीत मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींवर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासकांची नियुक्ती केली असून, गावनिहाय यादी जाहीर झाली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिले आहेत. त्यानुसार फलटण तालुक्यातील फेब्रुवारी २०२६ अखेर मुदत संपलेल्या ८० ग्रामपंचायतींवर विविध विभागांच्या विस्तार अधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रशासकांना कारभार स्वीकारण्याच्या सूचना
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या तरतुदींनुसार या प्रशासकांना ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळावा लागणार आहे. पुढील सहा महिने किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईपर्यंत हे प्रशासक कार्यरत राहतील. या प्रशासकांनी आपला पदभार तात्काळ स्वीकारण्याच्या सूचनाही देण्यात आल्या असून, कर्तव्यात कसूर केल्यास कारवाईचे अधिकार प्रशासनाने राखून ठेवले आहेत.
फलटण तालुक्यातील गावनिहाय नियुक्त प्रशासक
वाचकांच्या आणि ग्रामस्थांच्या माहितीसाठी प्रशासक आणि त्यांच्याकडे सोपवण्यात आलेल्या गावांची यादी खालीलप्रमाणे आहे:
१. श्री. ए. एस. गौड (वि. अ. कृषी) : साखळवाडी (पिंपळवाडी), तांबवे, जाधववाडी (फ), डोंबाळवाडी, कापडगाव, खामगाव, हिंगणगाव, खराडेवाडी, तडवळे, मुरुम, आरडगाव, काळज, राजाळे, शेरेचीवाडी (हिं).
२. श्री. एन. के. फडतरे (कृषि अधिकारी) : कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, अलगुडेवाडी, घाडगेवाडी, निरगुडी, धुमाळवाडी, मुळीकवाडी, मलवडी, निंबळक, आंदरुड, धुळदेव, निंभोरे, बोडकेवाडी, फडतरवाडी, को-हाळे.
३. श्री. ए. एन. संकपाळ (वि. अ. शिक्षण) : भिलकटी, रावडी बु., जिंती, सांगवी, कोरेगाव, रावडी खु., शिंदेवाडी, कांबळेश्वर, होळ, सोनगाव, ढवळेवाडी निं.
४. श्री. एम. के. चितळकर (वि. अ. कृषी) : सोनवडी खु., तिरकवाडी, कुरवली बु., शिंदेगर, सरडे, राजुरी, जावली, साठे, टाकळवाडे, सोनवडी बु., पवारवाडी, जाधववाडी (ता.).
५. श्रीम. एस. एल. सोनवणे (वि. अ. कृषी) : सासवड, शेरेशिंदेवाडी, ठाकूरकी, वडगाव, मिरढे, नाईकबोमवाडी.
६. श्री. सी. एम. शिंदे (वि. अ. पंचायत) : सस्तेवाडी, वाघोशी, कापशी, काशिदवाडी, फरांदवाडी, घाडगेमळा, नांदल, तावडी, बीबी, हणमंतवाडी, वडजल, आळजापूर.
७. श्री. व्ही. व्ही. निंबाळकर (वि. अ. पंचायत) : मुंजवडी, विंचुर्णी, शेरेचीवाडी ढ., भाडळी बु., भाडळी खु., ढवळ, गुणवरे, वाखरी, झिरपवाडी.