माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयागराजचे पथक २७ ते २९ या कालावधीत साताऱ्यात


दैनिक स्थैर्य । दि. २१ मार्च २०२३ । सातारा । रक्षा लेखा महानियंत्रक यांच्या मार्फत पी.सी.डी.ए (पेन्शन) प्रयागराज यांची पथक स्पर्शबाबत माहिती देण्यासाठी व अडी अडचणी सोडविण्यासाठी दि. 27 ते दि. 29 मार्च 2023 या कालावधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व निवृत्ती वेतन धारक माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून करण्यात आले आहे.


Don`t copy text!