पेटीएमने रूपे क्रेडिट कार्ड्स लॉन्च केले


दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२३ । मुंबई । भारतातील अग्रगण्य पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी आणि क्यूआर व मोबाइल पेमेंट्सचा अग्रणी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड (ओसीएल) ने आज रूपे नेटवर्कवर पेटीएम एसबीआय कार्ड लॉन्च करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी प्युअर-प्ले क्रेडिट कार्ड जारीकर्ता एसबीआय कार्डसोबत सहयोग केल्याची घोषणा केली आहे.

२०२० मध्ये सुरू झालेला पेटीएम व एसबीआय कार्ड यांच्यामधील सहयोग आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या रूपेसह विस्तारत आहे. भारतात सर्वसमावेशक, डिजिटल-फर्स्ट आर्थिक सेवांच्या विकासाला अधिक चालना देण्यासाठी तिन्ही स्वदेशी ब्रॅण्ड्सनी सहयोग केला आहे. नेक्स्ट-जनरेशन को-ब्रॅण्डेड कार्ड वापरकर्त्यांना अपवादात्मक रिवॉर्ड्स व फायदे देत क्रेडिट कार्ड अनुभव पुनर्परिभाषित करते.

वेलकम बेनीफिट म्हणून ग्राहक जवळपास ७५,००० रूपयांच्या विशेषाधिकारासह पूरक पेटीएम फर्स्ट मेम्बरशिपचा आनंद घेऊ शकतात, ज्यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म मेम्बरशिप, पेटीएम अॅपच्या माध्यमातून विमान तिकिटांवर सूट यांचा देखील समावेश आहे. डिजिटलप्रेमींसाठी डिझाइन करण्यात आलेले कार्ड्स पेटीएम अॅपवर आणि लाखो ऑनलाइन व ऑफलाइन स्टोअर्सवर वापरल्यास रिवॉर्ड्स व बचत देतात. कार्डधारकांना पेटीएम अॅपवर चित्रपट व प्रवासांची तिकिटे बुक केल्यास पेटीएम एसबीआय कार्डवर ३ टक्के कॅशबॅक मिळते. तसेच पेटीएम अॅपवरील इतर सर्व खरेदींसाठी २ टक्के कॅशबॅक आणि इतरत्र खर्चांवर १ टक्के कॅशबॅक मिळते.

पेटीएमचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, ‘‘भारत भावी पेमेंट्स क्रांतीच्या टप्प्यावर आहे, जेथे क्रेडिट प्रमुख पेमेंट निवड बनेल. एसबीआय कार्डसोबत सहयोगाने पेटीएम रूपे क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी उत्तम निवड असेल. आमचे वापरकर्ते अगोदरपासूनच क्यूआर कोड-आधारित पेमेंट्स सेवेचा लाभ घेत आहेत आणि यूपीआय क्यूआर कोड्सवर रूपे क्रेडिट कार्डसच्या कार्यसंचालनासह मोबाइल फोन्सच्या माध्यमातून व्यवहारांना अधिक चालना मिळेल, ज्यामधून डिजिटल पेमेंट्समधील नवीन युगाची सुरूवात होईल.’’

पेटीएमचे अध्यक्ष व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर भावेश गुप्ता म्हणाले, ‘‘आम्हाला भारतीय तरूणांच्या व व्यावसायिकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करणाऱ्या स्वदेशी रूपे नेटवर्कचे पाठबळ असलेल्या आमच्या नवोन्मेष्कारी को-ब्रॅण्डेड क्रेडिट कार्डसच्या लॉन्चसह एसबीआय कार्डसोबतच्या बहुमूल्य सहयोगाला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा आनंद होत आहे. या सहयोगासह आमचा एकसंधी व लाभदायी अनुभव देत ‘न्यू टू क्रेडिट’ वापरकर्त्यांना औपचारिक अर्थव्यस्थेमध्ये आणण्याच्या माध्यमातून भारतातील क्रेडिट वापरण्याच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणण्याचा मनसुबा आहे.’’

एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रामा मोहन राव अमारा म्हणाले, ‘‘आम्ही तरूण व डिजिटली विकसित ग्राहकांना क्रेडिट कार्ड्स अधिक प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशासह हे कार्ड लॉन्च करण्याकरिता पेटीएमसोबत सहयोग केला. पेटीएम एसबीआय कार्ड आमच्या पोर्टफोलिओमधील सर्वात लोकप्रिय कार्ड बनले आहे आणि रूपे नेटवर्कवर या कार्डच्या लॉन्चसह आम्ही उत्पादन मूल्य तत्त्व अधिक दृढ करत आहोत. भारतभरात रूपेची व्यापक पोहोच आणि यूपीआयवर रूपे क्रेडिट कार्डसच्या स्वीकार्यतेसह ग्राहक त्यांच्या खर्चांमधून अधिकाधिक फायदे मिळवण्याकरिता या कार्डचा लाभ घेऊ शकतात.’’

एनपीसीआयच्या सीओओ प्रवीना राय म्हणाल्या, ‘‘आम्हाला रूपेच्या व्यापक नेटवर्कवर या क्रेडिट कार्डच्या लॉन्चसाठी पेटीएम व एसबीआय कार्डसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. आमचा विश्वास आहे की, हे कार्ड ग्राहकांसाठी प्रमुख क्रेडिट सोल्यूशन ठरेल. यूपीआयवर एनसीआयच्या क्रेडिट कार्ड सेवा सुरू झाल्यापासून आम्ही अद्वितीय, मूल्य-आधारित रूपे क्रेडिट कार्ड्स देण्याप्रती सतत काम करत आहोत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या पाठबळासह सानुकूल मूल्यतत्त्व देत रूपेला आधुनिक, समकालीन व उत्साही ब्रॅण्ड म्हणून स्थापित होताना पाहून आनंद होत आहे.’’


Back to top button
Don`t copy text!