कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालिका सौ. जयश्रीताई सस्ते यांचा निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार


दैनिक स्थैर्य | दि. १९ मे २०२३ | फलटण |
नुकतीच फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणची निवडणूक पार पडली. यामध्ये निरगुडी गावच्या सौ. जयश्रीताई गणपत सस्ते या भरघोस मतांनी विजयी झाल्या. याबद्दल त्यांचे निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला.

यावेळी ज्योतिर्लिंग विविध कार्यकारी सोसायटी निरगुडीचे संचालक रघुनाथ गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष लहुकुमार गोरे, श्रीमंत रामराजे युवा मंच निरगुडीचे संघटक सुनिल गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे, अनिल गोरे, पत्रकार सुरज गोरे, अजित गोरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

या सर्वांनी नवनिर्वाचित संचालक सौ. जयश्रीताई गणपत सस्ते यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!