पवारांचे वागणे म्हणजे चीत भी मेरी पट भी मेरा; सदाभाऊ खोत यांचा सातार्‍यात हल्लाबोल


स्थैर्य, सातारा , दि.९ : शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात जे लिहिले आहे,  तेच कृषीनिती आणि तीन कृषी विधेयकांमध्ये आहे. सचिन तेंडुलकरला शेतक र्‍यांबाबत ज्ञान नसले, तरीही तो जे अन्न खातो त्याची त्याला जान असते. तसे  पवार यांनी कुठे कुस्त्या खेळल्या, कुठे लंगोट शिवली तरीही ते कुस्तीगिर परिषदेचे  अध्यक्ष, कुठे बॅटींग अन बॉलिंग केली तरीही ते क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होतेच.   पवारांचे वागणे म्हणजे ‘चीत भी मेरी अन् पट मेरा’ असे आहे, असा हल्लाबोल  माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केला.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रयत  क्रांती संघटनेचे शंकर शिंदे, मधुकर जाधव, सचिनकुमार नलवडे, प्रकाश साबळे  यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी खोत म्हणाले, दोन महिन्यापेक्षा जास्त काळ सुरु असलेलं आंदोलन हे  नेमकं कोणत्या उद्देशाने सुरु आहे. हे शंकास्पद आहे. जे लोक मोदींना जनाधाराच्या  माध्यमातून हरवू शकत नाहीत. ते आंदोलनात घूसून शेतकर्‍यांचा बुरखा पांघरुण  शिरले आहेत. त्यांना शेतकर्‍यांची चिंता नाही, ना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांची. देशाला  स्वातंत्र मिळाल्यानंतर शेती उत्पादन पिछाडीवर होते. 1965 नंतर नवे तंत्रज्ञान  आले. अनेक उत्पादन वाढवली. आता प्रश्‍न हा आहे की उत्पादन वाढवण्याचा नाही  वाढलेलं उत्पादन विकण्याचा आहे, मार्केट उपलब्ध करण्याचा प्रश्‍न आहे. तोच प्रश्‍न  सोडविण्यासाठी हे तीन कृषी विधेयक आणले आहेत. 70 वर्षात जे झाले नाही ते  आता होत आहे. जसे घुबडाला उजेडाची भीती असते. तसे काही घुबडांना शेतक र्‍यांच्या  नावावर आंदोलन करुन अंधाराच साम्राज्य हवं आहे. म्हणजे त्यांना शेतक र्‍यांचे खळ लुटता येईल, असे त्यांना वाटते.


Back to top button
Don`t copy text!